

नुकतीच 'बिग बॉस १९' ची सुरुवात झालीये. या कार्यक्रमाच्या पहिलीतच आठवड्यात बसीर अली आणि कुनिका सदानंद यांच्यात वाद झाला. यासगळ्यांमध्ये एका स्पर्धकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो स्पर्धक म्हणजे गौरव खन्ना. गौरवने नुकतीच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. आता तो बिग बॉसच्या घरात आला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही बरीच मोठी आहे. नुकतेच मृदुल तिवारी आणि गौरव खन्ना बिग बॉसच्या घरात फिरताना दिसले. यादरम्यान ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना दिसले.