
Famous Actress Kamilla Belyatskaya Passes Away:
कुणाचा मृत्यू कधी होईल याचा काही अंदाज लावू शकत नाही. काळ कधी कुणासमोर आ वासून उभा ठाकेल याचा नेम नाही. असाच एका अभिनेत्रीचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झालाय. २४ वर्षीय रुसी अभिनेत्रीवर काळाने झडप घातलीय. योग करायला गेली असताना एका जोरदार लाटेच्या धक्क्याने ती वाहून गेली आणि त्यानंतर तिचा दुःखद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून अनेकांना धक्का बसलाय.