

dilwale dulhaniya le jayenge climax
esakal
DDLJ Movie Climax Seen: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलेलं. १९९५ मधील या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड मोडले. आजही प्रेक्षकांना या चित्रपटातील प्रत्येक पात्र लक्षात आहे. या चित्रपटात जेव्हा शेवटचा सीन दिसतो ज्यात अमरीश पुरी काजोलला जा सिमरन जा म्हणतात, तेव्हा चित्रपटातील प्रत्येक पात्र हजर असतं. मात्र त्यात एक अभिनेत्री नाहीये. आणि ही अभिनेत्री असती तरी कदाचित या चित्रपटाचा शेवट आणखी रंजक झाला असता. ही अभिनेत्री होती अमरीश पुरीच्या बहिणीची भूमिका हिमानी शिवपुरी. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिमानी यांनी त्यांच्या तिथे नसल्याचं मोठं कारण सांगितलं.