
गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात झी मराठीवरही काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला. वीण दोघातली ही तुटेना' असं या मालिकेचं नाव आहे. झी मराठीची ही नायिका आता पार्ट येतेय म्हणून प्रेक्षक आनंदी झाले होते. अशीच आणखी एक अभिनेत्री तब्बल २५ वर्षानंतर झी मराठीवर परत येतेय.