
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असणारी 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या टीआरपी यादीत खाली उतरताना दिसतेय. स्टार प्रवाहावरील ही मालिका कायम टीआरपीमध्ये टॉप ३ मध्ये होती. मात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिकेला रामराम ठोकला आणि प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली. मालिकेतील सागर आणि मुक्ता यांची जोडी प्रेक्षकांना आवडते. मात्र आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतलाय. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.