
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत असे कित्येक अभिनेते आहेत ज्यांनी नृत्याचं प्रशिक्षण घेतलंय. मराठीतही असे अनेक प्रशिक्षक आहेत जे पुरुष आहेत आणि डान्स शिकवतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील जे पुरुष कोरिओग्राफर उत्तम लावणी करतात. मात्र त्या सगळ्यांनीच लहानपणापासूनच यासाठी खूप खचता खाल्लेल्या असतात. अनेक लोकांचे टोमणे ऐकलेले असतात. पुरुषाने नृत्य करणं हे आजही आपल्या समाजात वाईट समजलं जातं. याचा अनुभव छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्याला देखील आलाय. अभिनेता नकुल घाणेकर याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.