

yashshree masurkar
esakal
छोट्या पडद्यावरील कलाकार हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू केलाय. कुणी स्वतःचं हॉटेल सुरू केलं तर कुणी कपड्यांचा नवीन व्यवसाय सुरू केला. मात्र इंडस्ट्रीमध्ये अशी एक अतरंगी अभिनेत्री आहे जी अभिनयासोबतच रिक्षा चालवते. काम करता करता रिक्षा चालवते आणि भाडंही घेऊन जाते. सेटवरही ती कारने नाही तर रिक्षाने जाते. तिची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. तिने काही वर्षांपूर्वी कार विकून रिक्षा खरेदी केली. आता कुठेही जायचं असेल तर ती स्वतः रिक्षा चालवत जाते.