
कलाकार हे आपल्या फिटनेसबद्दल बरेच जागरूक असतात. ते कायम आपल्या आरोग्यावर लक्ष देतात. मात्र कधीकधी शूटिंगदरम्यान सेटवर अपघात झाल्याचं आपण ऐकतो. ही दुखापत असूनही काही कलाकार पुन्हा नव्या जोमाने कामाला उभे राहतात. अशाच एका अभिनेत्रीला गंभीर दुखापत झालीये ज्यामुळे पुढचे काही आठवडे ती बेडवरुन उठूही शकत नाही. तिच्या गुडघ्याची सर्जरी झालीये. त्याचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलेत. चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.