

POET TUKARAM DHANDE
ESAKAL
सोशल मीडियावर अनेक गोष्टी दररोज व्हायरल होत असतात. यात काही चांगल्या गोष्टी असतात तर काही वाईट. मात्र कुणालाही एका रात्रीत स्टार बनवण्याची ताकद ही या सोशल मीडियात आहे. आता इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात रानकवी तुकाराम धांडे हे दोन भावांची गोष्ट सांगतायत. दोन भावांमध्ये खूप प्रेम आहे मात्र त्यांच्या बायकांना वाटणी हवी आहे. मग हे दोघे वाटणी कशी करतात हे रानकवींनी सांगितलंय. ट्रेकर्स कट्टा ११ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.