
सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. तमिळ चित्रपट निर्माते विक्रम सुगुमारन यांचे सोमवार, २ जून रोजी मदुराईहून चेन्नईला बसने प्रवास करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघ्या ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक मृत्यूने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना देखील धक्का बसलाय. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली.