
कोरोनानंतर अनेक कलाकारांनी लिव्ह इनमध्ये राहणं पसंत केलं. आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी काही जोडपी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. त्यातच छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय जोडी गेली २२ वर्ष एकमेकांसोबत लिव्ह इनमध्ये राहतेय. मात्र लग्नाचा अजूनही आपला काही विचार नसल्याचं त्याने सांगितलंय. हा अभिनेता आहे संदीप बसवाना आणि अभिनेत्रीचं नाव आहे अश्लेषा सावंत. संदीप ४६ वर्षाचा आहे तर अश्लेषा ४० वर्षाची. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संदीपने त्यांच्या नात्याबद्दल सांगितलंय.