

PRAJAKTA GAIKWAD ALKA KUBAL FIGHT STORY
ESAKAL
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने 'आई माझी काळूबाई' या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मात्र काही महिन्यातच प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत दिसली. त्यानंतर या मालिकेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. लोकप्रिय मराठी अभिनेत्री अलका कुबल या मालिकेच्या निर्मात्या होत्या. त्यांनी प्राजक्तावर सेटवर उशीरा येते, ना ना नखरे करते असे आरोप केले होते. तर प्राजक्तानेही त्यांना उत्तर दिलं होतं. तेव्हा नेमकं काय घडलं होतं?