

prajakta-gaikwad-wedding
esakal
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. ती संपूर्ण महाराष्ट्राची येसूबाई झाली. आज २ डिसेंबर रोजी चाहत्यांची लाडकी प्राजक्ता खुटवडांच्या घरची सून झालीये. प्राजक्ताने शंभूराज खुटवड याच्याशी लग्नगाठ बांधलीये. अत्यंत थाटामाटात हे लग्न पार पडलंय. आता तिच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. प्राजक्ताने अतिशय सुंदर असा लूक केला होता. अशातच तिच्या मंगळसूत्राने आता चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.