
'स्वराज्यरक्षक संभाजी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेतने सगळ्यांची मनं जिंकलेली. अजूनही प्रेक्षक प्राजक्ताला महाराणी येसूबाई म्हणून ओळखतात. नुकताच 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यात रश्मिका मंदानाने येसूबाईंची भूमिका साकारलेली. तिला पाहून अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातही ही भूमिका प्राजक्ताने करायला हवी होती असं म्हटलं. आता प्राजक्ताने सकाळ प्रीमिअरशी बोलताना त्यावर भाष्य केलंय.