
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार सुरेश धस यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. प्राजक्ता म्हणाली, “सुरेश धस यांनी केलेली टिप्पणी खेदजनक आहे. गेल्या दीड महिन्यांपासून हा विषय सुरू आहे. या कालावधीत मी शांत राहिले, मात्र याचा अर्थ मी मूक संमती दिली असे समजू नये.”