phullwanti
phullwanti esakal

'फुलवंती' गाजतेय पण चित्रपटासाठी हास्यजत्रेच्या कलाकारांनी किती घेतलंय मानधन? प्राजक्ता माळीने स्वतः सांगितलं

Maharashtrachi Hastyajatra Actors Fees For Phullwanti: लोकप्रिय मराठी चित्रपट 'फुलवंती' सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय. मात्र यासाठी हास्यजत्रेतील कलाकारांनी किती मानधन घेतलंय?
Published on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हीचा 'फुलवंती' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. दसऱ्याच्या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या पाच दिवसात या चित्रपटाने १ कोटीच्या वर कमाई केलीये. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबतच चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांची फौज दिसतेय. अभिनेत्री चेतना भट्ट, वनिता खरात, गौरव मोरे, प्रसाद ओक, समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप आणि रोहित माने हे कलाकार चित्रपटात दिसत आहेत. या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलंय याबद्दल आता प्राजक्ताने स्वतः सांगितलं आहे.

या चित्रपटानिमित्त प्राजक्ताने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला हास्यजत्रेतील कलाकारांबद्दल विचारण्यात आली. त्यांच्याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, 'होय मी त्यांना ठरवून कास्ट केलं आहे. माझी खूप इच्छा होती की ज्या शोसोबत मी निगडीत आहे, जो शो माझ्या हृदयाच्या इतक्या जवळचा आहे. तर माझ्या पहिल्या निर्मित सिनेमात माझे आवडीचे कलाकार असावेत. असे काही सीन्स आमचे शूट करायचे राहिले होते ज्यात त्यांची निवड अतिशय चपखल होती. म्हणून मी सगळ्यांना प्रेमाने विनंती केली आणि सगळे अजिबात मानधन न घेता आलेत. सिनेमात जी काही जत्रा तुम्ही पाहाल त्यांची छोटी भूमिका आहे. पाहुणे कलाकार आहेत पण ते आहेत हे खरंय.'

प्राजक्ताच्या 'फुलवंती'मध्ये काम करण्यासाठी हास्यजत्रेतील कलाकारांनी अजिबात मानधन घेतलेलं नाही. 'फुलवंती' या चित्रपटाची टक्कर तेजस्विनी पंडित हिच्या 'येक नंबर' या चित्रपटासोबत आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

phullwanti
बिग बॉस जिंकलेल्या सुरज चव्हाणच्या नावावर सुरू आहे धक्कादायक प्रकार; रीलस्टारने पोस्ट करत केली चाहत्यांना विनंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com