

PRAJAKTA MALI
ESAKAL
मराठमोळी प्राजक्ता माळी हिला कुणाच्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्राजक्ता कायम तिच्या कामामुळे ओळखली गेलीये. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. मराठी सिनेसृष्टीत ती सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'फुलवंती' सिनेमात मुख्य भूमिका साकारत असतानाच निर्मितीही सांभाळली. अष्टपैलू असणाऱ्या प्राजक्ताची कायमच सोशल मीडियावर चर्चा होत असते. मात्र असं असतानाच प्राजक्ताने शेअर केलेल्या एका स्टोरीची जोरदार चर्चा रंगलीय.