Prarthana Behere Video: दोन 'मितवा' पुन्हा आल्या एकत्र... प्रार्थना बेहेरेच्या व्हिडीओमध्ये दडलंय खास सरप्राईज

Prarthana Beher Bai Ga: प्रार्थनाचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना 'मितवा' चित्रपटाची आठवण झाली आहे.
prarthana behere
prarthana behere sakal

सध्या 'बाई गं' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाण्यांवर अनेक जण रील व्हिडिओ करुन सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. या आधी 'मितवा' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या दोघांची जोडी पसंतीस उतरली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळेल. दोघांनी सोशल मिडीयावर एकत्र रील व्हिडीओ देखील शेयर केले आहेत. या चित्रपटाच्या चांद थांबला या गाण्यातही त्यांची केमिस्ट्री बघायला मिळतेय. मात्र पुन्हा प्रार्थना बेहेरेला 'मितवा' चित्रपटाची आठवण झालीय.

प्रार्थनाने नुकताच 'बाई गं' चित्रपटातील गाण्यावर नुकताच एक रील शेयर केलाय. या व्हिडिओत प्रार्थनाने खास सरप्राईज समोर आणलं. या व्हिडिओत प्रार्थनासोबत आणखी एक व्यक्ती पाहायला मिळतेय. ही व्यक्ती दुसरी, तिसरी कुणी नसून ती आहे महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. प्रार्थना आणि सोनाली या दोघी खास मैत्रिणी आहेत. शिवाय स्वप्नील आणि सोनालीचीही खास मैत्री आहे. म्हणूनच प्रार्थना आणि स्वप्नीलसाठी सोनालीने 'बाई गं' चित्रपटाच्या गाण्यावर खास रील व्हिडीओ केलाय. सोनालीने प्रार्थनासोबत या चित्रपटाच्या गाण्यावरील खास हूक स्टेप केलीय.

मितवा या चित्रपटात प्रार्थना, स्वप्नीलसह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील झळकली होती. त्यामुळे बाई गं चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली देखील त्यांच्या प्रमोशनमध्ये सहभागी झालेली दिसतेय.याआधी देखील प्रार्थना आणि सोनालीचे एकत्र व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळाले होते. शिवाय सोनालीच्या लग्नात प्रार्थनाची खास उपस्थिती पाहायला मिळाली होती.

'बाई गं' या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसह अनेक कलाकार झळकत आहेत. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पांडुरंग जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय.

prarthana behere
Ashadhi Wari 2024: हेच खरं सुख! टाळांच्या ठेक्यावर नाचली, फुगडी खेळली, वारीच्या रंगात रंगली मराठी अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com