

वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचे असते. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोक खांडेकर अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.