
प्रसिद्ध अभिनेता,दिग्दर्शक आणि पॉवरहाऊस कलाकार म्हणजे प्रसाद ओक यांना यंदाचा प्रतिष्ठित निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिग्गज अभिनेते असलेल्या निळू फुले यांच्या नावावर असलेला हा सन्मान मराठी चित्रपट, रंगभूमी आणि समाजावर त्यांच्या कार्य आणि सामाजिक संवेदनशीलतेद्वारे महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या कलाकारांना दिला जातो.