
लवकरच २०२५ सुरू होईल. जुन्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आलीये. आता नव्या वर्षाच स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज होतील. त्यात गेलं वर्ष कुणासाठी गोड होतं तर कुणासाठी कडू. काही मराठी कलाकारांसाठी मात्र हे वर्ष नवीन स्वप्न पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं होतं. २०२४ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश केला. या कलाकारांनी २०२४ मध्ये हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आणि हा आनंद चाहत्यांसोबतही शेअर केला.