
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. फक्त अभिनय आणि दिग्दर्शनच नाही तर उत्तम गायक म्हणूनही प्रसाद ओकची ओळख आहे. याबरोबरच तो फॅमिली मॅन म्हणूनही ओळखला जातो. पण सध्या प्रसाद चर्चेत आहे त्याला मिळालेल्या सरप्राईज गिफ्टमुळे. प्रसादच्या मुलाने त्याला बीएमडब्ल्यू ब्रॅण्डची आलिशान कार गिफ्ट केली.