

atul todankar on prashant damle
ESAKAL
कलाकार म्हटलं की कधी काम आहे तर कधी नाही. मात्र वेळ कुणावर सांगून येत नाही. असाच वाईट काळ अभिनेता अतुल तोडणकर यानेही अनुभवला. आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता अतुल गेले काही महिने छोट्या पडद्यापासून दूर होता. मात्र जेव्हा त्याने त्याचं कारण सांगितलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. अतुलला ब्रेन हॅमरेज झालेलं आणि तेव्हा उपचार घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा अभिनेते प्रशांत दामले यांनी त्याला कशी मदत केली हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.