
लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परब याने 'टाइमपास २' मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अनेक चित्रपटात तो मुख्य अभिनेता म्हणून दिसलाय. प्रथमेश लवकरच त्याचा आगामी चित्रपट गाडी नंबर १७६० मध्ये दिसणार आहे. त्यानिमित्ताने त्याने दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने लोकप्रिय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य. उतेकर हे मराठीत चित्रपट बनवायला आले होते. पण इथल्या कुणी त्यांना उभं केलं नाही असं तो म्हणालाय.