
नुकतीच आयपीएल पार पडलीये. २०२५ ची इंडियन प्रीमियर लीगची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या नावे केली. गेली १८ वर्ष हा संघ ही ट्रॉफी मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. मात्र यासोबतच गेली १८ वर्ष आणखी एक संघ ही ट्रॉफी मिळवण्यासाठी मेहनत करताना दिसतोय तो म्हणजे पंजाब किंग्स. यावर्षी फायनल्समध्ये येऊनही पंजाबला ट्रॉफी जिंकता आली नाही. केवळ ६ धावांच्या फरकाने पंजाबला हार पत्करावी लागली. आता या संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा हिने भावुक पोस्ट करत आपल्या संघाचं मनोबल वाढवलंय.