वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

Prem Kiitanu Movie Review: वीर पहाडिया आणि आफिया सय्यदच्या कॉलेजपासून सुरू होणाऱ्या प्रेमकथेचा रिव्ह्यू. अभिनय, कथा, संगीत, दिग्दर्शन आणि चित्रपटाला मिळालेले 3.5 स्टार जाणून घ्या.
Prem Kiitanu Movie Review

Prem Kiitanu Movie Review

esakal

Updated on: 

PREM KIITANU MOVIE REVIEW AND RATING: प्रेमात पडल्यावर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो, असं म्हणतात. रोजच्या धावपळीत अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीही खास वाटू लागतात. एखाद्याशी झालेली छोटीशी भेट, सहज झालेला संवाद किंवा नकळत झालेली नजरानजरही मनात घर करून जाते. त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी कारणं शोधली जातात. तिच्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो आणि तिच्या सहवासात वेळ कसा निघून जातो, हेही कळत नाही. अशाच प्रेमातल्या गोड आठवणी, भावनिक गुंतागुंत आणि नात्यांमधील चढ-उतार यांची गोष्ट सांगणारा ‘प्रेम कीटाणू’ हा चित्रपट दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ आणि ‘भैय्या जी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केल्यानंतर अपूर्व यांचा हा नवा चित्रपट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com