
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय मराठी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी त्यांच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिलीये. प्रिया आणि उमेश यांनी त्यांच्या वागण्याने चाहत्यांना की आदर्श घालून दिलाय. ते दोघेही चाहत्यांचे अत्यंत लाडके आहेत. ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. आता या जोडीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीये. प्रिया आणि उमेश यांनी नवीन घर घेतलं आहे.