
शब्दांकन ः मयूरी महेंद्र गावडे
सध्या प्रेक्षकांमध्ये क्राइम थ्रिलर आणि सस्पेन्स हॉरर चित्रपटांचा ट्रेंड प्रचंड गाजत आहे. या गोष्टीला लक्षात घेऊन मराठी सिनेसृष्टीतही अशा हटके आणि गूढ कथा असलेल्या चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच प्रवाहात दिग्दर्शक विक्रम प्रधान यांचा ‘रुखवत’ हा चित्रपट येत्या १३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पुनर्जन्म आणि बाहुला-बाहुलीच्या रहस्याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शनी इंदलकर आणि संतोष जुवेकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या निमित्ताने प्रियदर्शनीसोबत झालेली खास बातचीत...