
आजच्या पिढीतील तरुणाईच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करणारे अद्वैत थिएटरचे ‘विषामृत’ हे नाटक हसतखेळत धक्के देणारे आहे. लग्नानंतर घरात बायकोशी संवाद न करणारा, ऑफिसमधल्या सहकारी महिलेविषयी मात्र कणव-काळजी असणारा, बायको घरात असताना ऑफिसच्या कामात गुंतलेला आणि बायकोची मैत्रीण घरात आल्यावर तिच्याशी गंमतजंमत करीत वेळ घालवणारा नवरा अर्थात विशाल (शुभंकर तावडे). त्याला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणारी त्याची बायको अर्थात अमृता (प्रियदर्शिनी इंदलकर) यांची ही गोष्ट आहे. दोघांनीही ही गोष्ट रसिकांना कुठलाही ताण न देता छान रंगवली आहे.