
PRITHVIK PRATAP
ESAKAL
दिवाळी म्हंटली की घराघरात साफसफाई सुरू होते. ठिकठिकाणी दुकानं सजतात, घराला तोरण लागतं. फुलांनी, कंदिलांनी, शोभेच्या वस्तुंनी बाजारपेठ फुलते. साड्यांची, भांड्यांची जोरदार खरेदी होते. फटाके वाजवण्यासाठी सगळ्यांची रांग लागते. मात्र या सगळ्यात विशेष महत्व असतं ते फराळाला. लाडुं करंज्या, चकल्या, चिवडा, शंकरपाळी, नानकटाई असे कितीतरी पदार्थ स्त्रिया घरी बनवतात. मात्र या सगळ्या फराळात नावं ठेवली जातात ती अनारस्यांना. कारण अनारसे करायला अवघड असतात आणि ते प्रत्येकवेळी नीट बनत नाहीत, आता अभिनेता पृथ्वीक प्रताप याने त्याच्या घरची दिवाळीची आठवण सांगितली आहे. जेव्हा त्याची आजी अनारसे करायची तेव्हा त्याला तिथे पहारेकरी म्हणून उभी करायची.