

punha ekda saade made teen
esakal
: ब्लॉकबस्टर ‘साडे माडे तीन’ या गाजलेल्या मराठी कॉमेडी चित्रपटाची आठवण पुन्हा ताजी करत आणि प्रेक्षकांना नॉस्टॅल्जियाचा खास अनुभव देत, मराठी प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १९ मार्च २०२६ पासून हा चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे. हलक्याफुलक्या विनोदाने, कुरळे बंधूंच्या भन्नाट गोंधळाने आणि धमाल प्रसंगांनी भरलेला हा सिक्वेल प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसण्याचा जबरदस्त अनुभव देणार आहे.