

purushottam berde on laxmikant berde
esakal
आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आणि प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेले लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार लवकर प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यांच्या टायमिंगला कुणीही आव्हान देऊ शकत नव्हतं. त्यांच्या चित्रपटांची यादी फार मोठी आहे. हिंदीमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मात्र त्यांना व्यसन जडलेलं आणि त्याच व्यसनाने त्यांना प्रेक्षकांपासून कायमचं दूर नेलं. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. मात्र त्यांच्या मृत्यूला ते स्वतःच जबाबदार असल्याचं वक्तव्य त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलेलं.