

pushkar shrotri
ESAKAL
पुष्कर श्रोत्री हे मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे. त्याने अनेक चित्रपट आणि नाटकात काम केलंय. त्याची 'हम तो तेरे आशिक हैं' ही मालिका चांगलीच गाजली होती. यातली त्याची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सध्या पुष्करने केलेलं एक वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आहे. आई-वडिलांचं आणि मुलांचं नातं कसं असावं हे त्याने एका मुलाखतीत सांगितलंय. सोबतच त्याच्या वडिलांनी त्याला दारू पितानाचे चार नियम सांगितले होते तेदेखील त्याने सांगितले आहेत.