
नवी दिल्लीः सुपरस्टार अल्लू अर्जुनला एका महिलेच्या मृत्यू प्रकरणात शुक्रवारी दुपारी अटक झाली होती. परंतु या अटकेची कारवाई दिसते तेवढी सरळसोपी नाही. उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण हे अल्लू अर्जूनचे काका अर्थात आत्याचे पतीचे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मदत होणं तर लांबच परंतु त्यांच्याशी वाकडं घेतल्याने अल्लूवर जेलमध्ये जाण्याची वेळ आल्याचं बोललं जातंय.