
अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा २' ची प्रेक्षक गेली वर्षभर आतुरतेने वाट पाहत होते. दोन वेळा या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली. तर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या बघता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार हेदेखील निश्चित होतं. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हिट ठरल्यानंतर पुढे मेकर्स 'पुष्पा २' मध्ये अल्लू अर्जुनला कसे सादर करतात हे पाहणं औसुक्याचं ठरणार होतं. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि कमाईच्या बाबतीत तो इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचं बोललं जातंय.