

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याचा 'पुष्पा २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने दोन आठवड्यात तब्बल १ हजार कोटींचा व्यवसाय केलाय. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडलेत. आता हा चित्रपट आणखी काही आठवडे बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज आहे. मात्र या चित्रपटाबद्दलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात चित्रपटात वापरण्यात आलेल्या लाल चंदनच्या लाकडाबद्दल खुलासा करण्यात आलाय. ते लाकूड नेमकं कसलं बनलेलं होतं हे त्यात स्पष्टपणे दाखवण्यात आलंय.