
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. मात्र गेले काही महिने ती बॉलिवूडमधून गायब होती. त्यानंतर राधिकाने काही फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता राधिका आई झाली आहे. लग्नाच्या १२ वर्षांनी तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय. एक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिलीये. तिच्या आनंदाला तर पारावार उरलेला नाही. तर चाहतेही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.