
लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट हे त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. दोन लग्न, मुलं आणि विशेष करून मुलगी पूजा भट्ट हिच्यासोबत केलेल्या लिप किसची प्रचंड चर्चा झालेली. पूजा आणि महेश यांनी एका मॅगझीनसाठी फोटोशूट केलं होतं. त्यात त्यांचा एकमेकांना लिप किस करतानाचा फोटो होता. हा फोटो या मॅगझीनच्या पहिल्याच पेजवर छापून आला होता. आता त्या फोटोबद्दल महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट याने भाष्य केलंय.