माझे वडील गेलेले आणि त्यांना फोटो काढायचे होते... प्रमोद महाजनांच्या निधनानंतर काय घडलेलं? राहुल महाजन म्हणाला-

Rahul Mahajan Recalls Pramod Mahajan Death: दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर राहुल महाजनला महिन्याभरातच अटक झालेली. तेव्हा नेमकं काय घडलेलं हे त्याने मुलाखतीत सांगितलंय.
rahul mahajan on pramod mahajan

rahul mahajan on pramod mahajan

esakal

Updated on: 

एक काळ होता जेव्हा राहुल महाजन हे नाव टीव्हीवर प्रचंड चर्चेत होतं. तो भाजप पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आहे. त्याने राजकारणात न येता वेगळ्याच क्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल त्याच्या चांगल्या कामांसाठी नाही तर त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि त्याच्या लग्नांमुळे चर्चेत राहिला. सगळयात मोठी गोष्ट म्हणजे प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर महिन्याभरातच त्याला अंमली पदार्थाच्या सेवनासाठी अटक करण्यात आली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राहुलने त्याच्या वडिलांच्या निधनावेळी काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com