
रितेश देशमुख, अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रेड २' या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रितेशने या चित्रपटात दादाभाई या राजकारण्याची भूमिका साकारली होती. तर अजय हा अमेय पटनायक याच्या भूमिकेत होता. जो एक आयकर विभाग अधिकारी आहे. एक वेगळा धाटणीचा चित्रपट असलेला 'रेड २' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. नुकताच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. आणि त्यातच प्रेक्षकांनी मेकर्सची ती चूक पकडलीये जी त्यांना थिएटरमध्ये दिसली नव्हती.