
अजय देवगन, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांचा क्राईम-थ्रिलर 'रेड २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या चित्रपटाने छ्प्परफाड कमाई केली. सुमारे ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे. ३५ दिवसांत या चित्रपटाने देशभरात १६९.९५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आणि जगभरात २३२.६० कोटी रुपयांची कमाई केली. आयकर अधिकारी अमेय पटनायकयाचं प्रेक्षकांनी छोट्या पडद्यावर स्वागत केलं. आता अमेय पटनायक ओटीटीवर झळकण्यासाठी तयार आहे. 'रेड २' च्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती समोर आली आहे. आता तुम्ही घरबसल्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.