
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक काळ गाजवला. 'भिगी पलके' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले. मात्र तेव्हा राज यांचं लग्न झालेलं होतं. राज हे नादिरासोबत विवाहित होते. तरीही त्यांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर काही वर्षातच स्मिता यांचं निधन झालं. मुलगा प्रतीक बब्बर याच्या जन्मावेळी बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. त्यांनी प्रतीकला जन्म दिल्यानंतर त्यांचं निधन झालं. मात्र स्मिता यांच्यासोबतचे शेवटचे हे क्षण खूप कठीण ओटे असं राज यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं. स्मिता या शेवटच्या क्षणी माफी मागत होत्या असं ते म्हणाले होते.