
RAJ KAPOOR SHAMMI KAPOOR
ESAKAL
एकाच कालखंडात रुपेरी पडद्यावर कार्यरत असताना दोन कलावंत एकत्र काम करू शकत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. नायक नायकांची आहेत तसेच दोन नायिकांचीदेखील आहेत. शम्मी कपूर आणि अशोक कुमार हे आयुष्यात कधीच एकत्र एका सिनेमात आले नाहीत. खरंतर शम्मी कपूर अशोक कुमार यांचे प्रचंड मोठा फॅन होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की अशोक कुमार यांचे चाळीसच्या दशकातील सिनेमे त्यांनी अनेक वेळा पाहिले होते. ‘अछुत कन्या’, ‘बंधन’ हे अशोक कुमार यांचे सिनेमे त्यांच्या आवडीचे होते.