

raja shivaji star fees
esakal
'राजा शिवाजी' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात वादळ येणार आहे. नुकताच रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. जो पाहून प्रेक्षकांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. हा रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सिनेमासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च आलाय. बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमधील बिग बजेट असलेल्या सिनेमांमधील एक असणाऱ्या या चित्रपटात मोठमोठे चेहरे पाहायला मिळणार आहेत. अभिनेता रितेश देशमुख ते संजय दत्त, अभिषेक बच्चन यांनी या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतलीये. आता या कलाकारांच्या मानधनाचा आकडाही समोर आलाय.