

zingchik
esakal
लहान मुलांचं विश्व मोठ्यांपेक्षा किती वेगळं असतं, त्यांच्या छोट्या इच्छा, हट्ट आणि कल्पनांमधून त्यांचं स्वतःचं एक जग तयार होत असतं. मुलांचं हेच निरागस विश्व उलगडणारा ‘चिकिझिंग’ हा मराठी चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून राजेंद्र बागते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. स्वतःच्या अनुभवांतून आणि लहान मुलांच्या स्वभावाचे निरीक्षण करत त्यांनी ‘चिकिझिंग’ची कथा आकाराला आणली. दिग्दर्शनाची आवड कशी निर्माण झाली, याविषयी बोलताना श्री. बागते म्हणाले, ‘‘मी गेली १८ ते २० वर्षे जाहिरात क्षेत्रात स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. या काळात अनेक दिग्दर्शकांसोबत काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.