
१९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'आनंद' या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टेलिव्हीजनवर लागल्यास प्रेक्षक तो आवडीने पाहतात. रसिकांचा लाडका 'आनंद' आता मराठमोळे रूप लेऊन समोर येणार आहे. विघ्नहर्ता फिल्म्सने मराठी भाषेत 'आनंद' चित्रपट बनवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. २९ डिसेंबर या राजेश खन्ना यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मराठी 'आनंद' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.