
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. रजनीकांत यांनी आपल्या कारकिर्दीत अफाट यश मिळवले आहे आणि आपल्या अनोख्या शैलीने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडलेत. अभिनयाप्रमाणे संपत्तीच्या बाततीतही रजनीकांत अनेकांच्या पुढे आहेत. त्यांच्याकडे आलिशान कार कलेक्शन असून आलिशान घरही आहे. दक्षिणेतील 'थलायवा' समजले जाणारे सुपरस्टार रजनीकांत यांची नेटवर्थ जाणून घेऊया.