
मराठी चित्रपट सृष्टीचे जनक म्हणवले जाणारे, भारतात सिनेसृष्टी वसवणारे दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर यापूर्वी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मराठी लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी याचा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्याच्या आयुष्यावर हिंदी चित्रपटदेखील बनवला जाणार आहे. दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी पुढाकार घेतलाय. आता बॉलिवूडला आणखी एक प्रेरणादायी कथा पाहायला मिळणार आहे.