
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचं प्रमोशन झालंय. अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच राजकुमार रावच्या घरात एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्याने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही गोड बातमी दिली आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा लवकरच आई- बाबा होणार आहेत. अभिनेत्याच्या पोस्टवर आता चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.