
Entertainment News : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नम आणि राम गोपाल वर्मा यांनी वेगवेगळ्या शैलीतून भारतीय सिनेमाला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी आजवर केवळ तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र गेल्या २७ वर्षांपासून दोघंही एकत्र आलेले नाहीत. यामागचं कारण खुद्द राम गोपाल वर्मा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत उघड केलं आहे.